आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक भारती’च्या पाचोरा, पारोळा कार्यकारिणी बरखास्त:शिक्षक भारती निवडणूक लढवणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष यांची सविचार सभा सोमवारी (05 सप्टेंबर) घेण्यात आली. यावेळी शिक्षक शिक्षकेतरांच्या न्याय हक्कांसाठी शिक्षक भारती निवडणूक लढवण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.

विविध विषयांवर केली चर्चा

माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, कार्यवाह चंद्रकांत देशमुख, उपाध्यक्ष विजय सोनवणे उपस्थित होते. कामकाज करत नसलेल्या कार्यकारिणी पाचोरा व पारोळा सभेत बरखास्त करण्यात आल्यात. यानंतर सावित्री फातिमा स्वास्थ्य कटुंब योजना राबवून शिक्षक भारती आजीव सभासद वाढवणे, एटीडी शिक्षकांना पदोन्नतीत डावललेल्या शिक्षकांना न्याय मिळवण्यासाठी व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावीत वाढीव गुण मिळण्यासंदर्भात संघटना प्रयत्न करणार आहे. जीपीएफ व एनपीएस यांच्या हिशोबासाठी वेतन पथक अधीक्षक कार्यालयावरुन मिळावा यासाठी पत्र देणार असून आवश्यकता भासल्यास संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. प्रसंगी कार्यवाह चंद्रकांत देशमुख, गोकूळ राजपुत, स्वप्नील वंजारी, संघटक सत्यावान चौधरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती

जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, कार्याध्यक्ष आर.जे. पाटील, कार्यवाह चंद्रकांत देशमुख, उपाध्यक्ष विजय सोनवणे, युवराज पाटील, गोकुळ राजपूत, सहकार्यवाह स्वप्निल वंजारी, दगडू पाटील, शांताराम महाजन, खजिनदार अमोल वाणी, राहुल पाटील, संघटक स्वप्नील वंजारी, प्रसिद्धीप्रमुख संजय वानखेडे, तालुकाध्यक्ष एरंडोल शेखर पाटील, चोपडा संजय बाविस्कर, भडगाव पंकज पवार, चाळीसगाव अजिझ खाटीक, भुसावळ विलास पाटील, जामनेर सत्यवान चौधरी, पदाधिकारी जगदीश पाटील, दिलीप पवार, नवल चव्हाण, सोमनाथ निकम, संजय पाटील, सभेस शिक्षक भारती सभासद आर एस तेले, प्रभाकर राऊत, विलास पाटील, संजय पाटील, दीपक आमोदकर, जी.जी. राजपूत, सूर्यभान महाजन, सोपानराव निकम, संजय पाटील, विकास पाटील, संजय मोतीलाल, डी.के.पाटील, व्हि.एन. सुरवाडे, के.के. पाटील, ए.ए. पाटील, रेहान खान, गणेश कुमावत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...