आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षाला एक सकारात्मक उर्जा निर्माण करीत ‘रक्तदान हे जीवनदान ’ या महत्वपूर्ण कार्यात आपलेही योगदान लाभावे, या हेतूने वर्षभरात शक्य तेव्हा रक्तदान करण्याचा संकल्प करीत अनेकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तदान करून संकल्पाला सुरुवात केली.
शहरातील विविध सामाजिक संस्थातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासह धार्मीक संस्थामध्येही रक्ततपासणीसह आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली.
कंजरवाड्यात 16 मित्रांनी केले रक्तदान
कंजरवाड्यात नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्यासह दिवंगत मित्राला स्मृतीदिनानिमित्त आठवण म्हणून 16 मित्रांनी रक्तदान करून नववर्षाची सुरुवात केली. स्वर्गीय रितेश दिलीप मांजरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कोणताही अवास्तव खर्च न करता मित्र परिवाराने रक्तदान शिबिराची संकल्पना राबवून दिवंगत मित्राला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दोन तासात १६ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. रेडक्रॉस सोसायटीच्या वैदकीय पथकासह जनसंपर्क अधिकारी उज्जवला वर्मा यांनी नियोजन केले.
दि आर्ट ऑफ लिव्हींग परिवार
दि आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे शिक्षकवाडीतील कार्यालयात नववर्षाची सुरुवात व श्री श्री रविशंकरजी यांच्या दौऱ्यानिमित्त भक्ती की लहर या अंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी 8 वाजेपासूनच शिबिरास सुरुवात झाली. जगण्याची कला याविषयी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पहिल्या सत्रात 14 तर दुसऱ्या सत्रात 15 जणांनी रक्तदान केले. डॉ. अनिल खडके, शामकांत चिंचोले, सुधाकर टोके, सुप्रिया गव्हारे, माधवराव गोळवलकर रक्तपेढीसह भूषण चौधरी, नितीन मोराणकर यांनी नियोजन केले.
सिंधीकॉलनी संत भोजाराम साहेब दरबार
सिंधी कॉलनीतील संत भोजाराम साहेब दरबारात नववर्षानिमित्त झुलेलाल साईजा प्यारा तर्फे रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. यात 111 जणांनी रक्ततपासणी केली. यात सीबीसी, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, थायरॉईडची तपासणी झाली. आयुर्वेद तज्ञ विलास लोहारे यांनी निरोगी जीवनासाठी आयुर्वेद चे महत्व व त्याचा वापर याविषयी माहिती दिली. डायग्नोस्टिकचे तनवीर पटेल, सिद्धार्थ सुरवाडे, तोसीफ पटेल, शुभम पाटील यांनी तपासणी केली.
ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष महेश चावला, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अविनाश सोनगीरकर, सचिव गिरधर डाभी, डॉ. नितीन धांडे उपस्थित होते. शिबिरात सिंधू एकता मंचचे हेमंत कुकरेजा, विजय तुलसी, बंटी बुटवाणी, राहुल तलरेजा, दीपक कुकरेजा यांनी नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.