आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफादर्स-डे चे औचित्य साधून रविवारी उज्ज्वल स्प्राऊटर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वडिलांकरता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालक हे विद्यार्थ्यांकरता शाळेतील विविध समारंभांना हजेरी लावून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत असतात. पण आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वडिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना प्रोस्ताहन देऊन खेळांचा आनंद साजरा केला.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
शाळेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी, प्रशासकीय समन्वयक स्वप्नील बोरसे, शैक्षणिक समन्वयक सुनयना चोरडिया व पद्मजा घैसास यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नंतर विद्यार्थ्यांनी वडिलांप्रती कविता तसेच गीत सादर केले व काही विद्यार्थ्यांनी दिमाखदार नृत्य सादर केले. इयत्ता 8 वीच्या तनय पाटील तसेच प्रद्युम्न जोशी या विद्यार्थ्यांनी तबला वादन करुन उपस्थितांची दाद मिळवली.
वडिलांसह मुलांनी लुटला आनंद
कार्यक्रमात वडिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात थ्रो-बॉल, स्लो-सायकलिंग, पूल-द-टेल अशा खेळांचे आयोजन केले होते. पालकांनी देखील उत्सफूर्तपणे खेळांमध्ये सहभाग नोंदवला व खेळांचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी शाळेचे विश्वस्त प्रवीण गगडाणी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयश पाटील व दिनेश पाटील या विद्यार्थ्यांनी केल तर शिक्षिका मनीषा ढाके यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.