आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांची वर्षपूर्ती:41 नगरसेवकांपैकी 32 जण असमाधानी‘सेने’च्या नऊपैकी पाच जणांचाही समावेश

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’ने 100 नागरिकांना प्रश्न विचारून जाणून घेतला मतप्रवाह; सहज संपर्क भावतोय

महापौर जयश्री महाजन यांच्या कारकिर्दीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला नकार देणाऱ्या नगरसेवकांना त्यांचे नाव छापणार नाही, असा शब्द देताच ते मनमोकळे बोलायला लागले. ४१ नगरसेवकांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यापैकी ३२ नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यात शिवसेनेच्या नऊपैकी पाच जणांचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे भाजपच्या (बंडखोर नव्हे) दोन नगरसेवकांनी महापौरांच्या कामकाजावर समाधानी असल्याचे सांगितले.

एक वर्षाचा जयश्री महाजनांचा महापौर पदाचा कार्यकाळ कसा राहिला, हे नगरसेवकांनीच सांगावे, अशी योजना होती; पण त्या अनुशंगाने ‘चांगलेही नाही व वाईटही नाही बोलणार’ असे सांगत प्रतिक्रिया द्यायला बऱ्याच नगरसेवकांनी नकार दिला. तुमचे नाव प्रसिद्ध करणार नाही, असा शब्द देताच तेच नगरसेवक पटापट बोलायला लागले. एकूण ७५पैकी काही महिला नगरसेविकांचे संपर्क क्रमांक बंद होते. काहींनी नाव छापले नाही तरी बोलणार नाही असे सांगत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. काहींनी नाव छापायला परवानगीही दिली; मात्र सर्वच नगरसेवकांच्या बाबतीत एकच नियम ठेवत कोणाचेच नाव प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आधी प्रतिक्रिया द्यायलाही नकार देणारे नगरसेवक नाव न छापण्याचा शब्द मिळताच मनमोकळे बोलू लागले

कामातील असंतुलनच कळीचे : ज्या सत्ताधारी नगरसेवकांनी असमाधान व्यक्त केले त्यांना त्यामागचे कारण विचारले. त्यावर काही विशिष्ट लोकांच्याच वॉर्डात विकास कामे होतात आणि काहींना मात्र डावलले जाते, असा सूर बहुतेकांकडून बोलताना आवर्जून व्यक्त होत होता. त्यामुळे नाराजीमागे ते मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे असूनही आपल्याला मात्र विश्वासात घेतले जात नाही, अशी शिवसेनेच्या काही नगरसेवकांची तक्रार होती.

सत्ताधारीच नाराज आहेत
शब्द मिळाल्यामुळे शिवसेनेचे एकूण नऊ नगरसेवक बोलायला तयार झाले. त्यापैकी चार जणांनी महापौरांच्या कामावर समाधान व्यक्त केले तर पाच जणांनी असमाधानी असल्याचे सांगितले. प्रभागनिहाय कामे करताना त्यात मोठ्या प्रमाणात असंतुलन निर्माण केले गेले असा त्यांचा सूर होता. ज्या भाजप बंडखोर नगरसेवकांमुळे जयश्री महाजन महापौर होऊ शकल्या त्या १३ बंडखोर नगरसेवकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी तब्बल १० जणांनी असमाधान व्यक्त केले तर तिघांनी समाधानी असल्याचे सांगितले. एमआयएमचे नगरसेवकही सत्ताधाऱ्यांबरोबर आहेत. त्यातल्या दोघांनी मत व्यक्त केले आणि दोघांचेही मत नकारात्मकच होते. महापालिकेतला एकमेव विरोधी पक्ष भाजपच्या १७ नगरसेवकांशी संपर्क झाला. त्यातल्या १५ जणांनी महपौरांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली तर दोघांनी चक्क समाधानी असल्याचे सांगितले. दोन वर्षात महापालिकेच्या कारभारात बदल जाणवतोय, असे सांगताना त्यांनी आपल्या पक्षाच्या सत्ताकाळात काहीच कामे होत नव्हती, त्यामानाने आता ती पुढे सरकताना तरी दिसतात, असे त्यांचे म्हणणे होते.

बातम्या आणखी आहेत...