आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यंदा सहा ग्रहणांपैकी भारतामध्ये दिसणार दाेन चंद्रग्रहण; पण एकही सूर्यग्रहण नाही दिसणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाची सुरूवात जल्लाेषात झाली आहे. ज्योतिषशास्त्र तज्ञही या वर्षातील ग्रहणांच्या प्रभावांचे आकलन करण्यात गुंतले आहेत. २०२३ या वर्षात सहा वेळा ग्रहण लागणार आहेत. त्यात तीन सूर्यग्रहण, एक चंद्रग्रहण व दाेन माध्यचंद्रग्रहण असतील. मात्र, भारतात तीन सूर्यग्रहण आणि एक कंकणाकृती चंद्रग्रहण दिसेल. भारतात केवळ एक कंकणाकृती चंद्रग्रहण व एक खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यातही कंकणाकृती चंद्रग्रहण उपछाया ग्रहण आहे. यामुळे ग्रहणाच्या प्रभावाचे नियम लागू होणार नाहीत असे खगाेल अभ्यासकांकडून सांगण्यात येते.

असे दिसणार यंदाचे सूर्यग्रहण {सूर्यग्रहण २० एप्रिल व १४ ऑक्टोबर या दिवशी होणार आहेत. २० एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण हे खग्रास सूर्यग्रहण असेल. ते पूर्व आशिया, ऑस्ट्रोलिया, पेसिफिक महासागर, इंडियन ओशन या भागातून पाहता येणार आहे. {१४ ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. ते आफ्रिका, उत्तर व दक्षिण अमेरिका, पेसिफिक महासागर येथून दिसणार.

पहिले चंद्रग्रहण ५ मे राेजी दिसेल पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होईल. हे देशात दिसू शकणार आहे. हे ग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण आहे. ते युरोप, आशिया, अफ्रिका, इंडियन अोशन येथून दिसेल. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारे ग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ते युरोप, आशिया ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण अमेरिका, पेसिफिक ओशन येथून दिसेल, असे खगाेल अभ्यासकांनी सांगितले.

वैज्ञानिक दृष्टिकाेन नजरेसमाेर ठेवावा यंदा सहा ग्रहण आहेत. त्यात केवळ दोन चंद्रग्रहण दिसतील. मात्र, एकही सूर्यग्रहण दिसणार नाही. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या खगोलीय घटना ज्ञानवर्धक आणि महत्वाच्या असतात. समज-गैरसमज मनात न ठेवता वैज्ञानिक दृष्टीकोनातून याकडे बघावे व आनंद घ्यावा. -अमोघ जोशी, खगोल अभ्यासक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...