आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Out Of The Six Eclipses This Year, The Second Lunar Eclipse Will Be Seen In India; But No Solar Eclipse Will Be Seen, So There Is No Rule.| Marathi News

खगोलशास्त्र:यंदा सहा ग्रहणांपैकी भारतामध्ये दिसणार दाेन चंद्रग्रहण;‎ पण एकही सूर्यग्रहण नाही दिसणार, त्यामुळे नियमही नाही‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाची सुरूवात जल्लाेषात झाली‎ आहे. ज्योतिषशास्त्र तज्ञही या वर्षातील‎ ग्रहणांच्या प्रभावांचे आकलन करण्यात‎ गुंतले आहेत. २०२३ या वर्षात सहा वेळा‎ ग्रहण लागणार आहेत. त्यात तीन सूर्यग्रहण,‎ एक चंद्रग्रहण व दाेन माध्यचंद्रग्रहण‎ असतील. एक खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार‎ आहे. त्यातही कंकणाकृती चंद्रग्रहण एक‎ उपछाया ग्रहण आहे. यामुळे ग्रहणाच्या‎ प्रभावाचे नियम लागू होणार नाहीत असे‎ खगोल अभ्यासक सांगतात.‎ गेल्या ऑक्टोबर अश्विन शुक्ल पक्ष‎ पोर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होते.‎

याचा परिणाम भारतभर पडला होता.‎ ग्रहणावेळी काही नियम लागू करण्यात आले‎ होते. पंडित रोहित पुजारी यांनी सांगितले की,‎ या नव्या वर्षात सूर्याचा प्रभाव अधिक‎ असणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी‎ सूर्य रवी तिथीमध्ये शनिदेव आपल्या राशीत‎ राहिले.

ज्यात कोणताही ग्रह घरात प्रवेश करु‎ शकत असल्यास सर्व राशींसाठी अधिक‎ परिणामकारक ठरते. सूर्यग्रहण २० एप्रिल व‎ १४ ऑक्टोबर या दिवशी होणार आहेत. २०‎ एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण हे खग्रास‎ सूर्यग्रहण असेल. ते पूर्व आशिया,‎ ऑस्ट्रोलिया, पेसिफिक महासागर, इंडियन‎ ओशन येथून दिसणार आहे. दरम्यान,‎ सूर्यग्रहण व चंद्रग्रहण ही सर्वात मोठी‎ खगोलीय घटना असल्याने त्याची सर्वांना‎ उत्सकुता असते.‎

असे दिसणार चंद्रग्रहण‎
पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होईल.‎ हे देशात दिसू शकणार आहे. हे‎ ग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण आहे.‎ ते युरोप, आशिया, अफ्रिका,‎ इंडियन अोशन येथून दिसेल. २८‎ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारे‎ ग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे.‎ ते युरोप, आशिया ऑस्ट्रेलिया,‎ उत्तर व दक्षिण अमेरिका,‎ पेसिफिक ओशन येथून दिसेल.‎ २०२३ या वर्षातील सूर्य आणि चंद्र‎ ग्रहणांपैकी फक्त चंद्रग्रहणाचे‎ दर्शन होवू शकणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...