आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग:मेहरूणमागूून पाचाेरा रस्ता महामार्गाशी जाेडणार

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरात प्रवेश न करताच पाचाेरा रस्ता आता थेट एमआयडीसीमार्गे आैरंगाबाद महामार्गाशी जाेडला जाणार आहे. विकास आराखड्यातील मेहरूण तलावामागून एमआयडीशी जाेडणाऱ्या डीपी रस्त्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा माेबदला म्हणून टीडीआर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे या रस्त्याचा मार्ग माेकळा झाला.

महानगरपालिकेने २००४ या वर्षी मंजूर केलेल्या विकास आराखड्यात शीट क्रमांक ६ व ७ यामध्ये शिरसोली जकात नाका ते एमआयडीसीमध्ये गीतांजली केमिकल्सकडे जाणारा ३० मीटर रुंद डीपी रस्ता ठेवला हाेता. या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना काेणताही माेबदला दिला जाणार नव्हता. यावर शेतकऱ्यांनी आैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली हाेती.

अंतर हाेणार कमी, वाहतुकीची काेंडीही टळणार
पाचाेऱ्याकडे जाताना अथवा तिकडून एमआयडीसी व आैरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांमुळे अजिंठा चाैफुलीवर वाहतूक काेंडी हाेते. या नवीन रस्त्यामुळे एमआयडीसीचे अंतर तीन किलाेमीटरने कमी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...