आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीला जाण्याची आस:एकीकडे विठ्ठलाच्या भेटीची हुरहुर तर दुसरीकडे कोरोनाचे संकट; दिंडीत वारकऱ्यांची संख्या रोडावली

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर वारी, दिंड्यांना परवानगी मिळाली आहे. परंतु, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. गुरुवारी दिव्य मराठीच्या चमुने पारोळा ते आडगाव या 12 किलोमीटर अंतरात वारकऱ्यांसोबत चालून त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. त्यावेळी हा मुद्दा समोर आला आहे. शुक्रवारी सखाराम महाराज यात्रेतून चोपडा येथील एक वृद्ध महिलेने भडगाव तालुक्यातून माघारी घेत एसटी बसने घर गाठले.

एकदा का विठ्ठलाच्या भेटीची आस लागली तर वारकऱ्याचे मन कोठेच रमत नाही, असे वाक्य सांगितले वारीतील 25 वर्षीय तरुणाने. हा तरुण धुळे जिल्ह्यातील पिंपळगाव येथून अमळनेरला येऊन वारीत सहभागी झाला होता. त्याच्यी गप्पा मारत एकेक पाऊन पुढे चालत प्रवासाला सुरुवात झाली. एकीकडे विठ्ठलाच्या भेटीची हुरहुर तर दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा दुहेरी मनस्थितीत यंदा लोक अडकलेले आहेत. अनेक घरतील तरुण मंडळींनी वृद्धांना सुरक्षितता म्हणून वारीत जाण्यास नकार दिला.

पंढपुरला जाण्याची आस

मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वाढते आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात महाराष्ट्रासह इतर राज्य, परदेशातून सुमारे 15 लाख भाविक जमण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे वारकरी द्विधा मनस्थितीत आहेत. सन 2019 मध्ये शेवटची पायी वारी झाली होती. यानंतर दोन वर्षांचा खंड पडला. त्यामुळे अनेकांना पंढपुरला जाण्याची आस लागली आहे. अशा वारकऱ्यांनी वाट धरली आहे. पण जे येऊ शकले नाहीत त्यांच्या मनात घालमेल सुरू आहे. घरी असलेले वारकरी फोन करून वारीतील हालचाली विचारुन घेत आहेत. आज कुठे मुक्काम? काय जेवलात? रात्री कोणत्या मंदिरात भजन आहे? असे विचारुन ते हाल-हवाल घेत आहेत. येऊ न शकल्याचे दुख:ही त्यांना बोचते आहे. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा निम्मे वारकरी घरी बसून आहेत. पण जे वारीत हजर आहे त्यांच्यातील उत्साह तीळमात्र कमी झालेला नाही, अशी माहिती तरुणाने दिली.

बातम्या आणखी आहेत...