आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन सुखी करणारे हनुमान चरित्र प्रेरणादायी‎:पांजरपोळ संस्थेतील चरित्र कथेमध्ये पंडित पुष्पा नंदन महाराज यांचे प्रतिपादन‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंता, भयापासून मुक्ती देऊन कष्टमय‎ जीवनाला सुखी करणारे श्री हनुमान‎ चरित्र सदैव प्रेरणादायी असल्याचे‎ प्रतिपादन पंडित पुष्पा नंदन महाराज यांनी‎ मंगळवारी पांजरपोळ संस्थेतील हनुमान‎ चरित्र कथेत केले.‎ कथेत दुपारी महिलांची कलश यात्रा‎ काढण्यात आली. यात धर्म सेवा महिला‎ मंडळ, जळगाव शहर तालुका माहेश्वरी‎ महिला मंडळ, सिखवाल ब्राह्मण समाज‎ महिला मंडळ, संस्कार परिवार,‎ माहेश्वरी गो सेवा संघ सहभागी झाले‎ होते. या वेळी भक्तांनी प्रभू श्रीराम व‎ पवनपुत्र हनुमानाचा जयघोष केला. श्री‎ हनुमंत चालिसा ग्रंथाचे पूजन‎ ओमप्रकाश जाजू परिवाराने केले.‎ सायंकाळी सजीव आरासमधून बाल‎ रूपातील श्री हनुमानाच्या जन्माेत्सव‎ कार्यक्रम झाला. महाआरती पांजरपोळ‎ संस्थेचे अध्यक्ष विजय काबरा यांनी‎ केली. समितीचे अध्यक्ष विश्वनाथ‎ जोशी, सुरेश कोठारी, दिलीप व्यास,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दीपक लढ्ढा, गोपाळ पंडित, चंदू पंडित,‎ मुरली चांडक हे नियोजन करीत आहे.‎