आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Pankajana Has No Place In The Rajya Sabha, Because He Was Defeated In The Legislative Assembly Too, He Must Have Made A Statement Out Of Anger Eknath Khadse

पंकजांना राज्यसभेत स्थान नाही:विधानसभेतही पराभूत करण्यात आले, म्हणून नाराजीतून वक्तव्य केले असेल - आ.एकनाथ खडसे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेत स्थान नाही दिले, विधानसभेतही पराभूत करण्यात आले म्हणून नाराजीतून त्यांनी वक्तव्य केले असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे. पंकजा मुंडेंच्या मनात ही खंत असल्याचेही खडसेंनी म्हटले आहे.

खडसे म्हणाले?

आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, त्यांची उपेक्षा होत असेल तर ते योग्य नाही, त्यांना न्याय मिळायला हवा. पंकजा मुंडेंवर गेली अनेक वर्षे नेहमीच अन्याय होत आला आहे. तर मधल्या काळात त्यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. यामुळे त्यांचे नाराज असणे स्वाभाविक आहे. मात्र मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असे जर टीकेने म्हटले असेल तर ते दुर्दैवी असून नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असेही एकनाथ खडसे म्हटले आहे.

पंकजा मुुंडे काय म्हणाल्या?
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत'' असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज एका खासगी कार्यक्रमात बोलताना केले. पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...