आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या चिरमाडे कुटुंबीयांचा उपक्रम:लाइटिंग म्युझिक थेरपीचा वापर करत साकारली युनिक निसर्गरम्य पारसबाग

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक ठिकाणी घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर विविध प्रकारची झाडे लावून पारसबाग तयार करण्यात आली आहे. गणेशवाडी भागात राहणाऱ्या चिरमाडे कुटुंबीयांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करुन लाइटिंग विथ म्युझिक सिस्टीम देखील तयार केली आहे. साडे तीनशेहून अधिक झाडांना म्युझिक थेरपीद्वारे जिवंत ठेवण्याचे युनिक आयडिया त्यांनी वापरली असून त्यांची ही आयडियाची संकल्पना नागरिकांना चांगलीच आकर्षित करत आहे.

जळगावच्या चिरमाडे कुटुंबीयांचा उपक्रम

मनीष चिरमाडे यांनी लाइटिंग विथ म्युझिक थेरपीची संकल्पना वापरुन त्यांनी निसर्गरम्य आणि युनिक पारसबाग तयार केली. घराच्या पुढील मोकळ्या जागेत व गॅलरीत त्यांनी सुमारे साडेतीनशे कुंड्यांमध्ये विविध प्रकारची झाडे लावली आहे. तर जमिनीत 8 ते 10 झाडे मोठी आहेत. ही झाडे जगली तर पाहिजे शिवाय या बागेत मन देखील रमायला हवे याकरता सुरुवातीला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यास सुरवात केली.

तसेच 50 फुटाच्या पाईपाला कट करुन त्यात माती भरुन शोच्या फुलांची झाडे लावली. यासोबतच घराच्या बाहेरील भिंतीला देखील घरीच वारली पेंटिंगने डेकोरेट करण्यात आले आहे. यामुळे समोरील भाग हा आकर्षित झाला आहे. लहान टोपल्या, पाईप, रिकाम्या बॉटल यामध्ये झाडे लावल्याने जागेची देखील बचत झाली व टाकाऊ वस्तूंचा उपयोग देखील झाला.

जुन्या लाइटिंगचे आकर्षक डेकोरेशन

बागेत 10 ठिकाणी रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये जुन्या लायटिंग दुरुस्त करुन त्या लावण्यात आल्या आहे. यामुळे याठिकाणी रंगेबिरंगी असा प्रकाश बघायला मिळतो. अगदी सहज कोणीही घरी तयार करू शकेल अशा वस्तूंचा याठिकाणी वापर करण्यात आला आहे. तसेच म्युझिक हे मनात शांती देत असल्याने झाडांना देखील आनंदी ठेवता यावे याकरता एका स्टोन स्पीकरची घरीच निर्मिती करण्यात आली आहे. या स्पीकरमुळे संपूर्ण बागेत गाणे ऐकू येतात.

बातम्या आणखी आहेत...