आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला. तो ऑफलाइन शाळा सुरू हाेऊनही कायम आहे. मुले माेबाइलवर ऑनलाइन गेम खेळत असल्याने चिंतेत सापडलेल्या पालकांकडून आता बाैद्धिक खेळण्यांचा पर्याय शाेधला जाताे आहे. शहरातील अनेक खेळणी विक्रेत्यांकडे बाैद्धिक खेळणी, पजल्स यांची विचारणा वाढली आहे.
काेराेनानंतर लहान मुलांची माेबाइलची सवय पालकांसाठी माेठी डाेकेदुखी ठरते आहे. शाळेतून आल्यानंतर किंवा सुटीच्या दिवशी मुलांकडून पालकांकडे सतत माेबाइलची मागणी हाेत आहे. तर शाळेत न जाणारे ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना रडल्यानंतर पालकांकडून थेट हाती माेबाइल साेपवला जाताे आहे. त्यामुळे लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. माेबाइलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी बाैद्धिक खेळणी पजल्स हे अतिशय प्रभावी माध्यम ठरत आहे.
कल्पनाशक्तीला वाव : १५ वर्षांपर्यंतच्या मुलांची प्रतिभा, कल्पनाशक्ती यांना वाव मिळेल अशी खेळणी बाजारात आहेत. त्यात विशेषत: कागद आणि लाकडांचा वापर केलेला आहे. मुलांना या साहित्याचा वापर करून काय तयार करता येऊ शकते? याचे पजल्सही दिले जातात.
या खेळण्यांना मागणी ५ ते ८ वर्षे वयाेगटातील मुलांमध्येही स्क्रीन टाइम वाढलेला आहे. माेबाइलवरील कार्टून पाहण्याची सवय साेडवण्यासाठी वुडन पजल्स, वुडन सुडाेकू, माॅन्टेसरी टाॅइज, कॅलेंडर आणि कॅल्क्युलेटर ही विविध शैक्षणिक खेळणी घेण्याकडे पालकांची पसंती आहे.
माेबाइलची सवय कमी हाेईल मुलांची मोबाइलची सवय साेडवण्यासाठी आता बाैद्धिक खेळणी घेतली आहेत. या खेळण्यांमध्ये मुलांच्या पसंतीत उतरतील असे पर्याय असल्याने त्यांची माेबाइलची सवय सुटेल अशी अपेक्षा आहे. पूनम पाटील, पालक, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.