आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांची वुडन पजल्स, सुडाेकूसह माँटेसरी टाॅइज, बाैद्धिक खेळांना पसंती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना काळात आॅनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम तुलनेने वाढला आहे. आॅफलाइन शाळा सुरू हाेऊनही अनेक मुलांचा माेबाइलवरील स्क्रीन टाइम मात्र अजूनही कायम आहे. मुले माेबाइलवर आॅनलाइन गेम खेळत असल्याने चिंतेत सापडलेल्या पालकांकडून आता बाैद्धिक खेळण्यांचा पर्याय शाेधला जाताे आहे. शहरातील अनेक खेळणी विक्रेत्यांकडे बाैद्धिक खेळणी, पजल्स यांची विचारणा वाढली आहे.

काेराेनानंतर लहान मुलांची माेबाइलची सवय पालकांसाठी माेठी डाेकेदुखी ठरते आहे. शाळेतून आल्यानंतर किंवा सुटीच्या दिवशी मुलांकडून पालकांकडे सतत माेबाइलची मागणी हाेत आहे. तर शाळेत न जाणारे ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना रडल्यानंतर पालकांकडून थेट हाती माेबाइल साेपवला जाताे आहे. त्यामुळे लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे.

माेबाइलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी बाैद्धिक खेळणी पजल्स हे प्रभावी माध्यम ठरत आहे. शहरातील विविध विक्रेत्यांकडून मुलांचे मानसशास्त्र, आवड लक्षात घेऊन तयार केलेल्या खेळणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ही खेळणी मुलांसह पालकांच्या पसंतीस उतरत आहेत.

माेबाइलची सवय कमी हाेईल
रडल्यानंतर मुलांना शांत करण्यासाठी थेट हाती माेबाइल दिल्यामुळे आता मुले सतत माेबाइल मागतात. माेबाइल साेडवण्यासाठी आता बाैद्धिक खेळणी घेतली आहेत ती त्यांना अधिक भावताहेत. - पूनम पाटील, पालक, जळगाव

कल्पनाशक्तीला वाव : १५ वर्षांपर्यंतच्या मुलांची प्रतिभा, कल्पनाशक्ती यांना वाव मिळेल अशी खेळणी सध्या बाजारात आलेली आहेत. त्यात विशेषत: कागद व लाकडांचा वापर केलेला आहे. मुलांना या साहित्याचा वापर करून काय तयार करता येेते? याचे पजल्स दिले जातात.

या खेळण्यांना अधिक मागणी
५ ते ८ वर्षे वयाेगटातील मुलांमध्येही स्क्रीन टाइम अधिक वाढलेला आहे. माेबाइलवरील कार्टून पाहण्याची सवय साेडवण्यासाठी वुडन पजल्स, वुडन सुडाेकू, माॅन्टेसरी टाॅइज, कॅलेंडर आणि कॅल्क्युलेटर ही विविध शैक्षणिक खेळणी घेण्याकडे पालकांची पसंती आहे.

बातम्या आणखी आहेत...