आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बेसमेंटधारकांवर कारवाई:पार्किंगची समस्या सुटेना; मनपाचा केक कापून निषेध

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा मालकीचे तसेच खासगी व्यापारी संकुलातील बेसमेंटचा पार्किंग ऐवजी व्यावसायिक वापर केला जात आहे. वारंवार मागणी करूनही पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. महापालिका प्रशासन अनधिकृत बेसमेंटधारकांवर कारवाई करत नाही. आश्वासन देऊन दाेन वर्ष उलटले तरी प्रशासनाने ठाेस पाऊल न उचलल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर केक कापून निषेध केला.

शहरातील व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगची जागा असली तरी त्यावर व्यावसायिक वापर केला जात आहे. शहरातील सर्वच मनपा मालकीचे असाे की खासगी संकुल व दुकानात पार्किंगच्या जागा गिळकृत केल्या आहेत. यासंदर्भात सर्वेक्षण हाेऊन १३३ मालमत्तांचा शाेध घेण्यात आला. त्यापैकी केवळ ३७ मालमत्ताधारकांची सुनावणी झाली व त्यांच्या मालमत्ता सील करण्याचा निर्णय झाला; परंतु प्रत्यक्षात केवळ ६ सकारण आदेश पारित केले. उर्वरित ९६ प्रकरणांत अद्याप काेणताही निर्णय झालेला नाही. प्रशासनाकडून वारंवार सर्वेक्षण करून सुनावण्या घेतल्या जातात; परंतु पुढे काहीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड राेष निर्माण हाेत आहे.

एकीकडे मनपा पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देत नाही आणि दुसरीकडे वाहतूक शाखा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. दरम्यान, मनपाला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी दीपक गुप्ता यांच्यासह कार्यकर्ते आयुक्त देविदास पवार यांच्याकडे गेले हाेते. या वेळी आश्वासनांचा उल्लेख असलेला केक कापायला दिला; परंतु आयुक्त पवार यांनी नकार दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनाबाहेर केक कापून मनपाचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...