आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण प्रकरण:पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकास आमदार नीलेश लंके यांची मारहाण

पारनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकास लसीकरणाचे टोकण विकत असल्याचा आरोप करत आमदार नीलेश लंके यांनी मारहाण केली असल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात केली. त्याचबरोबर डॉ. उंद्रे आणि डॉ. आडसूळ यांना शिवीगाळ केल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या गैरव्यवहाराची किनार या वादाला असल्याचे समजते.

आमदार लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात वापरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तपशील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंद्रे यांच्याकडे यापूर्वीच मागितला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंद्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बुधवारी (४ ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजता तहसीलदार आणि डॉ. आडसूळ यांच्या आदेशानुसार लसीच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या टोकणचे वाटप करण्यात आले.

रात्री साडेदहा वाजता आमदार नीलेश लंके आणि रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी टोकण वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना घरून रुग्णालयात बोलावले. त्यांच्यावरती टोकण विकण्याचा आरोप करीत आमदार लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली. यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोर मारहाणीचा प्रकार घडल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. गटविकास अधिकारी माने यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...