आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता राेकाे आंदाेलन:अर्धवट रस्ताकाम; पालिका अधिकाऱ्यांना घेराव

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकाेतील शिवाजी चाैक, लेखानगर भागात जाण्यासाठी लघुत्तम मार्ग ठरणार आहे. परंतू सरस्वती शाळेच्या बाजूने जिथून रस्ता सुरू हाेताे तिथूनच शंभर, दाेनशे मीटरवरच काम रखडले आहे. काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांना काॅलनी, साेसायटीतून मार्ग काढावा लागताेय. रात्री अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्ता पूर्ण करण्यासाठी परिसरातील नागरिक, वाहनधारक, व्यावसायिकांकडून मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल नाईक, कविता नाईक, संतोष भुजबळ, सुनील घुगे, अमोल पैठणकर, रोहित नाईक, गौरव पाटील, अमोल तुपे, गणेश आहेर, विजय खाडे, कृष्णा मंडलिक, मनोहर पाटील, अशोक करंके, डॉ. सचिन दहिवेलकर, संदीप रावते, अविनाश चव्हाण, धनंजय थेटे, नंदकुमार भोर, अतुल पाटील, भालचंद्र थोरात, युवराज गायकवाड, प्रमोद नानकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...