आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विद्यापीठात बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धा:3 जिल्ह्यातील संघांनी नोंदवला सहभाग; कुलगुरुंच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस (पुरुष/महिला) स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांचे हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे उपस्थित होते. यावेळी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमास जळगाव विभाग सचिव प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, एरंडोल विभाग सचिव प्रा.डॉ. देवदत्त पाटील, नंदुरबार विभाग सचिव प्रा. डॉ. अरविंद कांबळे, उपस्थित होते.

खेळातील यशाचे गमक म्हणजे थ्री एस आहे. यात एक म्हणजे स्टटेजी. समोरील खेळाडूची उणिवा शोधून स्टेटजी आखणे, नंतर स्टबिलिटी परिस्थिती नुसार स्टॅमिना राखून खेळणे, तिसरे स्पोर्ट्समन स्पिरीट अर्थात सामना संपल्यानंतर इर्षा न ठेवता विजयी संघा सोबत हस्तांदोलन करून अभिनंदन करणे होय. आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी खेळाडूसाठी चांगली संधी आहे. त्यांनी प्रयत्न करावा व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करावे तसेच खेळाडूंनी पदकासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कुलगुरु डॉ. माहेश्वर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.आर. चौधरी यांनी केले. आभार प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी मानले.

असा आहे स्पर्धेचा निकाल

  • बॅडमिंटन पुरुष : जळगाव विरुद्ध एरंडोल 2-3 एरंडोल विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबार 3-00 धुळे विजयी
  • बॅडमिंटन महिला : जळगांव विरुद्ध एरंडोल 2-00 जळगांव विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबार 02-00 धुळे विजयी, नंदुरबार विरुद्ध एरंडोल 00-02 एरंडोल विजयी
  • टेबल टेनिस महिला : धुळे विरुद्ध नंदुरबार 3-00 धुळे विजयी, जळगांव विरुद्ध एरंडोल 03-1 जळगांव विजयी
  • टेबल टेनिस पुरुष : नंदुरबार विरुद्ध एरंडोल 00-03 एरंडोल विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबार 03-00 धुळे विजयी
  • बास्केबॉल महिला : धुळे विरुद्ध नंदुरबार 17-02 धुळे विजयी, जळगाव विरुद्ध एरंडोल 8-5 जळगांव विजयी
बातम्या आणखी आहेत...