आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान आपले स्टेशन केव्हा मागे पडले याचे भान रहात नाही. रेल्वेचा नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अलार्म सुविधेचा मोठा दिलासा मिळणार आहे. वेकअप अलार्म अलर्ट या सुविधेद्वारा प्रवाशांना २० मिनिटे आधीच अलार्मद्वारे स्थानकाची सूचना मिळेल. त्यासाठी प्रवाशांना केवळ तीन रुपये खर्च येईल.
रेल्वेतर्फे प्रवाशांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्यात रॅम्प, सरकता जिना, लिफ्ट, व्हायफाय आदी सुविधा दिल्र्या जात आहेत. आता रेल्वेच्या वेकअप अलार्म अलर्ट या सुविधेमुळे प्रवासी प्रवासादरम्यान रात्रीची झोपही काढू शकणार आहेत. प्रवासादरम्यान ज्या स्थानकावर प्रवाशाला उतरायचे असेल ते सुटण्याचा धोकाही या सुविधेमुळे राहणार नाही. कारण रेल्वे प्रवाशाला आपले स्थानक येण्याच्या २० मिनिटे आधीच जागे करणे शक्य हाेणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुरू केले आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना २० मिनिटे आधी उठवले जाणार आहे. झोप लागल्याने अनेकदा रेल्वेच्या प्रवाशांचे स्टेशन मागे पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीपासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. ही सेवा चौकशी सेवा क्रमांक १३९वर सुरू करण्यात आली आहे.
कशी मिळणार सुविधा ही सेवा चौकशी सेवा क्रमांक १३९वर सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना १३९ नंबरच्या चौकशी सिस्टिमवर अलर्टची सुविधा मागावी लागेल. या सुविधेचा लाभ प्रवाशाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेदरम्यानच्या प्रवासात मिळणार आहे. सुविधेनुसार प्रवाशाला त्याला पाहिजे असलेल्या स्थानकादरम्यान उठवले जाणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशाला केवळ तीन रुपये खर्च येणार आहे. जर या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घेतला तर प्रवाशाला त्याचे स्थानक येण्याच्या २० मिनटे आधी फोन अलर्ट पाठवण्यात येणार आहे.
हेल्पलाइन १३९वर करा काॅल... डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आईआरसीटीसीची १३९वर कॉल करून भाषा निवडावी. त्यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी ७ नंबर दाबा. त्यानंतर विचारल्यावर आपला १० अंकी पीएनआर टाका. याच्या पुष्ठीसाठी १ डायल करा. त्यानंतर आपल्या नंबरवर ही सर्व्हिस अॅक्टिव्ह होऊन प्रवाशाला स्टेशनपुर्वी २० मिनिटे आधीच वेकअप अलर्ट मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.