आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लाेष‎:पाटील शाळेच्या स्नेहसंमेलनात‎ चिमुकल्यांनी केला जल्लाेष‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि.‎ पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन‎ घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला‎ योगेश भालेराव यांनी बहारदार गीतांचा‎ कार्यक्रम सादर केला. त्यानंतर चिमुकल्यांचा‎ कला दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.‎ उद््घाटन शशिकांत वडोदकर, परिवर्तनचे‎ शंभू पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी‎ खलिल शेख यांच्या हस्ते सरस्वती पूजन‎ करून करण्यात आले.

सूर्यकांत पाटील,‎ देवेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.‎ कार्यक्रमात मोरया मोरया, अंबेचे गोंधळी,‎ कोकणी नृत्य, गुजराती घुमर, आई भवानी‎ गोंधळ यासारखे पारंपरिक नृत्य, फॅनी डान्स,‎ बम-बम भोले, इतनी सी हसी, दिल पे मास‎ है, सामी सारखे नृत्य, राष्ट्रभक्ती, बेटी‎ बचाओ, सोशल मीडियाचे दुष्परिणाम यावर‎ आधारित म्युझिकल ड्रामा, छत्रपती शिवाजी‎ महाराजांचा पोवाडा अशा विविध विषयांवर‎ आधारित कार्यक्रम घेण्यात आला.‎

प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा‎ पाटील यांनी केले. या वेळी चंद्रकांत भंडारी,‎ प्रा. एस. एस. पाटील, अविनाश चौधरी,‎ आरती चौधरी, प्रणिता झांबरे, मंजूषा चौधरी,‎ उमेश सूर्यवंशी, विश्वजित चौधरी आदी‎ उपस्थित होते. कल्पना तायडे यांनी‎ सूत्रसंचालन केले. मंगल गोठवाल, गायत्री‎ पवार यांनी निवेदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...