आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थ त्रस्त:ममुराबाद येथे पेव्हर ब्लाॅक निखळले ;  दुरुस्तीचाही विसर

ममुराबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार निधी, चौदाव्या-पंधराव्या वित्त आयोग व अन्य योजनेतून ममुराबाद गावात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवरही ब्लॉक बसवले असून, ते निखळल्याने ग्रामस्थांना रस्त्याने वापरणे कठीण झाले आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष हाेत असल्याने लाेकभावना तीव्र आहे. ‘पेव्हर ब्लॉक’चा वापर ज्या ठिकाणी जास्त रहदारी नसते अशा ठिकाणी होणे गरजेचे असते. कारण, त्यावरून अवजड वाहने धावल्यास खाली वाळूचा थर देऊन त्यावर लॉकिंग पद्धतीने बसवण्यात येणारे पेव्हर ब्लॉक निखळून पडतात. त्यामुळे रस्त्याची समस्या सुटण्याएेवजी उलट आणखी जटील बनते. दोन ब्लॉकमध्ये साचलेले पाणी, चिखल अनेकवेळा रस्त्याने वापरणाऱ्यांच्या अंगावर उडते. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघात होण्याचे प्रकार सुद्धा घडतात. एकदा ब्लॉक बसवले की संबंधित ठेकेदार किंवा ग्रामपंचायत तिकडे ढुंकूनही पाहत नाही. साहजिक ब्लॉकसाठी झालेला खर्च तर वाया जातोच, याशिवाय रस्ता वापरण्यास योग्य न राहिल्याने ग्रामस्थांच्या डोक्याचा ताप वाढतो. फक्त निधी खर्च करायचा म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्यात अर्थ नसून, आमदार निधी किंवा वित्त आयोगाचा निधी यापुढे संपूर्णपणे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरणावर खर्च करण्यात यावा. पेव्हर ब्लॉक निखळून पडल्याने दुर्दशा झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

बातम्या आणखी आहेत...