आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचे वक्तव्य आम्हाला लागू होत नाही:विनाकारण राजकारण करणे पवारांनी टाळावे - गुलाबराव पाटील

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्तेच्या गैरवापराबाबत केलेले वक्तव्य आम्हाला लागू होतच नाही. त्यांनी आता विनाकारण राजकारण करणे टाळावे. राजकारणात प्रसंगानुसार खेळ खेळावा लागतो, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जळगाव येथे आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाले. तब्बल २० वर्षांनंतर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा शासनातर्फे घेण्यात येत आहेत. या वेळी पाटील यांनी मैदानावर सॉफ्टबॉलही टोलवला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. कॉलेजमध्ये क्रिकेट खेळायचो. सॉफ्टबॉल, क्रिकेटमध्ये साम्य असल्याचेही ते म्हणाले.

लोकप्रतिनिधी अटक करत नाहीत सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम उदाहरण अनिल देशमुख, खासदार संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांच्या अटकेवरून पुढे आल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावरही पाटील म्हणाले, अटक करण्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. सबळ पुरावे असल्यानंतरच एजन्सी अटक करत असते, हे सर्वांना माहिती आहेच.

बातम्या आणखी आहेत...