आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पीक विम्यापासून वंचित:40 शेतकऱ्यांना 12 टक्के व्याजासह रक्कम द्या; गुलाबराव पाटलांचे बँकांना आदेश

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम भरलेली असतानाही संबंधीत बँकांनी विमा कंपनीकडे रक्कम न पाठवल्यामुळे ते विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. अशा 40 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने वंचित शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ देण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुक्ताईनगर, निंभोरा शाखा, एचडीएफसी बँक चोपडा यांना दिले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुक्ताईनगर या बँकेच्या 23 तक्रारी, स्टेट बँक ऑफ इंडिया निंभोरा शाखेच्या 16 तक्रारी व एचडीएफसी बँक चोपडाची एक तक्रार अशा एकूण 40 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्यामुळे बँकांनी देय असलेली नुकसान भरपाई रक्कम व त्यावरील 12 टक्के व्याजासह रक्कम तात्काळ बँकेने द्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

2021-22 फळपिक विमा योजनेचे केळी पिकाचे वेगाचे वारे या हवामान धोक्याची नुकसान भरपाई रक्कम तसेच आंबा, डाळींब, पपई, मोसंबी या पिकांचेही हवामान धोक्यानुसार देय असलेली रक्कम 35 ते 40 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

2021-22 फळपिक विमा योजनेंतर्गत 16 शेतकऱ्यांचे केसीसी बँक खाते बंद असल्यामुळे, चुकीचे आयएफएससी कोड चुकीचे असणे व बँक खाते क्रमांक चुकीचा असणे या कारणांमुळे विमा कंपनीकडे रक्कम परत गेलेली आहे. ही रक्कम एआयसी कंपनीने त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. युनिवर्सल विमा कंपनी, जिल्हा प्रतिनिधी यांनी तातडीने जिल्ह्यातील प्रलंबीत शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते बँकांनी लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश वितरित केल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...