आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेची शहरातील सुमारे सव्वालाख मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांकडून कर वसुलीसाठी पालिकेने शास्ती अभय याेजना जाहीर केली आहे. साेमवारपासून सुरू हाेणारी ही याेजना १५ मार्चपर्यंत आहे. यातून पालिकेला गेल्या सहा वर्षांपासून थकबाकी असलेल्या २६४ काेटी वसुलीची अपेक्षा आहे. याेजनेंतर्गत जमीन व इमारतीवरील मालमत्तेच्या थकबाकीपाेटी लावलेली शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. शहरातील १ लाख १२ हजार ८१३ थकबाकीदार मालमत्ताधारकांची माहिती पालिकेने तयार केली आहे.
यात एक ते सहा वर्षांपर्यंतच्या थकबाकीदारांकडे ९५ काेटी ७५ लाख ५७ हजार ७९६ रुपयांची निव्वळ थकबाकी आहे. याशिवाय २७ काेटींची शास्ती आहे. सहा वर्षांपेक्षा जास्त कर थकबाकी असलेल्या अकरा हजार मालमत्ता धारकांकडे ३४ काेटी रुपये घेणे आहेत. चालू वर्षासाठी मालमत्ता कराची ८८ काेटींची तर थकबाकी १४८ काेटी आहे. एकूण मागणी २३६ काेटी आहे. त्यापैकी ५५ काेटी रुपये वसूल केल आहेत. यापूर्वी दंडाची रक्कम भरलेल्यांना याेजनेचा लाभ मिळणार नाही. लाभ घेण्यासाठी पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.
नागरिकांना आॅनलाइन करता येईल भरणा
मनपाने मिळकतदारांना बजावलेल्या मालमत्ता कराच्या बिलांवर क्यूआर काेड मुद्रित केला आहे, त्याद्वारे अथवा मनपाच्या http://jalgaonmc.org या वेबसाइटवरही आॅनलाइन भरणा करता येणार आहे. हा भरणा करताना नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय अॅप, फाेन-पे, गुगल पे द्वारेही करता येणार आहे. धनादेश (चेक) व डीडीद्वारे भरणा करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.