आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययाेजना:गाेवर संशयितांचे दाेन हजार अहवाल प्रलंबित, 20 नमुन्यांमध्ये नऊ बाधित

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात गाेवरची साथ सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत गाेवर बाधित आढळलेले नव्हते. शनिवारी प्राप्त झालेल्या २० नमुन्यांच्या अहवालातून नऊ बाधित निष्पन्न झाले. बाधित रुग्ण हे पाच तालुक्यातील असून, गाेवर साथीने संपूर्ण जिल्ह्यात आपले हातपाय पसरल्याचे चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यात दाेन, चाेपडा तीन, भुसावळ दाेन, अमळनेर एक तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे एक बाधित समाेर आला आहे.

शहरात दीड महिन्यांपूर्वी शहरातील नऊ भागातून ११ गाेवर बाधित समाेर आले. त्यात मास्टर काॅलनीतील तीन रुग्णांसह दाट व झाेपडपट्टी भागातील बालकांचा समावेश हाेता. आठ दिवसांपूर्वी प्रतापनगरात एकाच घरातील दाेन बालके संशयित रुग्ण म्हणून समाेर आले. त्यामुळे शहरात गाेवरचा प्रसार वाढत असल्याचे समाेर येते आहे. शहरात आतापर्यंत १६९ संशयित समाेर आले. ग्रामीण भागातही लक्षणे समाेर येत असल्याने जिल्हा परिषद आराेग्य यंत्रणेतर्फे सर्व्हे करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात गाेवरचा पहिला डाेस न घेतलेले ९०४ व दुसरा डाेस न घेणारे १२२३ असे एकूण २१२७ संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी दाेन हजारांवर नमुन्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.

चार बाधितांचा घाेळ रात्री मिटला
गेल्या पंधरा दिवसांपासून अहमदाबादच्या प्रयाेगशाळेकडे पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल ग्रामीण व पालिका आराेग्य यंत्रणेला प्राप्त झालेला नव्हता. ताे शनिवारी प्राप्त झाला. त्यात पाच तालुक्यातील पाच रुग्णांचे नंबर जुळले. परंतु चार रुग्णांचे नमुने आराेग्य यंत्रणेच्या नंबरशी जुळत नव्हते. त्यामुळे चार बाधित कुठले? हा प्रश्न हाेता. ताे रात्री उशिरा सुटला. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सर्व बाधित हे ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट झाले.

साेमवारपासून विशेष लसीकरण
जागतिक आराेग्य संघटनेच्या सूचनेनुसार साेमवारपासून शहरात १६ केंद्रांवर विशेष लसीकरण माेहीम राबवली जाणार आहे. २५ डिसेंबरपर्यंत ती सुरू राहील असे महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डाॅ. राम रावलानी व डाॅ. मनीषा उगले यांनी कळवले आहे.

असे आहेत लसीकरण केंद्र
शहरातील डाॅ. तल्हार क्लिनिक (शाहूनगर), एसएम आयटी काॅलेज, पाेलिस लाइन, दक्षतानगर, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर, अल्हिदा हाॅस्पिटल, शिवाजीनगर, कै. दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालय, शिवाजीनगर, डाॅ. अशाेक पाटील दवाखाना, सुभाष चाैक, डाॅ. राजेंद्र चाैधरी दवाखाना, जुनेगाव, गजानन मंदिर, सुप्रीम काॅलनी, दत्त मंदिर, सद‌्गुरूनगर, सुप्रीम काॅलनी, मासूमवाडी, अंगणवाडी क्र. ४८, पाेलिस चाैकी, भिलपुरा, रामनगर, अंगणवाडी क्र. ३९, सप्तशृंगी मंदिर, रेणुकानगर, मेहरूण, पिंप्राळा, ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ, रामानंदनगर, हरिविठ्ठलनगरात लसीकरण हाेईल.

बातम्या आणखी आहेत...