आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट:जळगावकरांनो, सांभाळा! अजून तीन दिवस उष्णतेची लाट, आवश्यकता असेल तरच सर्व खबरदारी घेऊन घराबाहेर पडावे

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून उष्णतेच्या लाटांनी पोळणाऱ्या जळगावकरांची अजून किमान तीन दिवस तरी तीव्र तापमानापासून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. कारण मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार ७ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४४ ते ४३ अंशांदरम्यान राहील. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मे हीटचे जोरदार तडाखे बसू शकतील. यामुळे उष्माघाताचा असलेला धोका पाहता आवश्यकता असेल तरच सर्व खबरदारी घेऊन घराबाहेर पडावे. दरम्यान, मंगळवारीदेखील जळगावचे तापमान ४४ अंशांवर पोहोचले होते.

यंदा मार्च का तापला?
यंदा मार्च महिन्यातच तापमानात एवढी वाढ का झाली? याबाबत आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांना विचारले असता, मार्च महिन्यात जो पाऊस अपेक्षित असतो, यंदा त्याच्या तुलनेत कोणत्याही विभागात सरासरी २५ टक्केदेखील पाऊस झाला नाही. परिणामी बाष्प कमी होऊन वातावरण आणि मातीदेखील कोरडी झाली. त्याचे परिणाम तापमान वाढीत झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले.

कुठे पाऊस, कुठे उष्णतेची लाट
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल.

...तरच तापमानात होईल घट
जळगावमधील उष्णतेची लाट अजून तीन ते चार दिवस कायम राहील. बंगालच्या खाडीत काही सिस्टिम तयार झाली आणि दक्षिणेकडून हवा बाष्प घेऊन आली तरच तापमानात काहीशी घट होऊ शकते.
डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान विभाग, आयएमडी

बातम्या आणखी आहेत...