आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर होणारा खर्च टाळून चोपडा पीपल्स बँक व ओम शांती पतपेढीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीला भरघोष अशी मदत दिली आहे.
देशासह राज्यात कोरोन आजाराचे मोठे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा हात दिला पाहिजे म्हणून आज चोपडा पीपल्स बँकेच्या सार्वजनिक ट्रस्ट तर्फे एक लाख एक हजार रुपये व ओम शांती नागरी पतसंस्था मार्फत ५१ हजार असे दोन धनादेश देऊन एकूण एकूण दीड लाख रुपयांचे मदत दिली आहे.
यावेळी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी धनादेश देताना दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, विश्वाला कोरोना आजाराने ग्रासून ठेवले असून आपण आज संकटच्या काळात कर्त्यव्य म्हणून मी आज वाढदिवस साजरा न करता चोपडा पीपल्स बँके कडून 1 लाख 1 हजार व ओम शांती नागरी पतसंस्थाच्या माध्यमातून 51 हजार असे जवळपास दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन हातभार लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहिल्या दिवसापासून चोपडा शहरात समाजाचे देणं लागतो म्हणून मदत करण्याच्या दृष्टीने हात पुढे केले आहे. यापुढे चोपडा पीपल्स बँक व त्याची सेवा ट्रस्ट मदतीसाठी केव्हाही दोन पाऊल पुढे राहील असे सांगितले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मी आज वाढदिवस साजरा केला नाही,फक्त कार्यकर्ते याच्या फोनवर शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.कोरोना आजाराला हरविण्यासाठी लोकांनी घरात थांबून सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रहास गुजराथी यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार अनिल गावीत यांना धनादेश देताना चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हाईस चेअरमन प्रवीण गुजराथी, संचालक सुनील जैन, उद्योजक आशिष गुजराथी, ऍड रवींद्र जैन, सीमा श्रावगी, परेश गुजराथी, गोविंद गुजराथी, संजय गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, मोरेश्वर देसाई, नेमीचंद जैन, विकास गुजराथी, ओम शांती पतपेढीचे मॅनेजर राजेश गुजराथी आदी हजर होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.