आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित कुलसचिव:विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलसचिव; डाॅ. विनाेद पाटील यांनी स्वीकारला पदभार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार डॉ. विनोद पाटील यांनी बुधवारी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांच्याकडून स्वीकारला. डॉ. विनोद पाटील हे विद्यापीठाचे सातवे नियमित कुलसचिव ठरले आहेत. १० मार्च रोजी गणितशास्त्र प्रशाळेतील प्रा. किशोर पवार यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.

जुलैअखेर कुलसचिव पदासाठी झालेल्या मुलाखत प्रक्रियेद्वारे डॉ.पाटील यांची कुलसचिवपदी निवड झाली होती. बुधवारी प्रा. पवार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित हाेते. सर्वांना साेबत घेऊन पथदर्शी असे काम करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित कुलसचिवांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...