आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांत पिस्तुलांचे फॅड:खंडेरावनगरात पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्यास अटक; शस्त्र वापरणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खंडेरावनगरात हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी अटक केली. पिस्तूल जप्त केले आहे. अश्विन विजय हिरे (वय 20, रा. खंडेरावनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

अश्विन हा पिस्तूल घेऊन फिरत होता. यामुळे परिसरातील लोक दहशतीत आले होते. ही माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सुधाकर अंभोरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांच्या पथकाने खंडेरावनगर भागात गस्त केली. काही वेळातच अश्विन मिळुन आला. अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीची पिस्तूल पोलिसांना मिळुन आली. ही पिस्तूल जप्त करुन अश्विला अटक केली आहे. अश्विनच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल कोठून आणले याची माहिती घेताय पोलिस

दरम्यान, अश्विनने हे पिस्तूल कोठुन आणले, याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देतो आहे. हे पिस्तूल त्याने कोठुन आणले याची माहिती पोलिस घेत आहेत. चोपडा तालुक्याच्या जवळ मध्यप्रदशातील उमर्टी येथून पिस्तूल येत असतात. गेल्या आठवड्यात नाशिक विभागाच्या विषेश पोलिस पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने दहा पेक्षा जास्त पिस्तूल चोपडा भागातून पकडल्या आहेत. त्याच अँगलने तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...