आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:खान्देश सेंट्रल रस्त्याबाबत न्यायालयामध्ये याचिका

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश सेंट्रलमधून रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी हाेत आहे. महापालिकेनेही काही महिन्यांपूर्वी नाेटीस बजावली हाेती. या विराेधात आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, महापालिका आपले म्हणणे मांडणार आहेे.

खान्देश सेंट्रल आवारातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी किशाेरराजे निंबाळकर यांनी रस्ता करून दिला हाेता. बरेच दिवस या रस्त्याचा प्रवाशांना उपयाेग झाला. मात्र, गेल्या वर्षभरापासून खान्देश सेंट्रलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेट उभारून ते बंद ठेवले जाते. या विराेधात शहरातील काही नागरिकांनी महापालिकेकडे धाव घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर मनपाच्या नगररचना विभागाने नाेटीस बजावली हाेती. या नाेटीसच्या विराेधात राजमुद्रा कंपनीने आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...