आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. शहरात ११२.०६ रुपये लिटर दराने पेट्रोल विक्री होत आहे; मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवारी सकाळी ११.३० वाजेदरम्यान सागर पार्कजवळील चौबे पेट्रोल पंपावर ५४ रुपये लिटर दराने पेट्रोल मिळत असल्याचे कळल्यावर येथे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने मनसेला हा उपक्रम गुंडाळावा लागला. दरम्यान, ७८ लोकांनी पेट्रोल भरून या स्वस्त दराचा लाभ घेतला. त्यांचे ४ रुपयांप्रमाणे ४२१२ रुपये वाचले.
मंगळवारी सकाळी शहरातील सागर पार्कजवळील पेट्रोल पंपात ५४ रुपये लिटरने पेट्रोल मिळत असल्याची माहिती कळताच या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळली. आधी ५४ रुपये ग्राहकांकडून घेण्याचे ठरले होते. मात्र, कोणाकडूनही ५४ रुपये न घेता सर्वांना एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात आले. तसेच गर्दी वाढल्यामुळे मनसे सैनिकांना हा उपक्रम आवरता घ्यावा लागला. यावेळी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपशहराध्यक्ष आशिष सपकाळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष योगेश पाटील, विभागप्रमुख साजन पाटील उपस्थित होते.
मनसेच्या उपक्रमात ७८ लिटर पेट्रोलचे मोफत वाटप^पेट्रोल पंपावर ५४ रुपयांत पेट्रोल मिळत असल्याची माहिती मिळाल्यावर काही मिनिटांत दुचाकीस्वारांची मोठी गर्दी झाली होती. यात ७८ लिटर पेट्रोल मोफत वाटण्यात आले. मात्र, येथे मोठी गर्दी झाल्याने अर्ध्या तासात हा उपक्रम बंद करण्यात आला. - प्रकाश चौबे, पेट्रोलपंप मालक
लोकांना आमच्या आनंदात सहभागी केले
पेट्रोलच्या दराने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी व लोकांना आमच्या आनंदात सहभागी करून घ्यायचे होते. अनेकांनी या उपक्रमात पेट्रोल भरले. केंद्र सरकारलादेखील या उपक्रमातून पेट्रोलच्या दराने होरपळणाऱ्या जनतेच्या भावना मांडायच्या असल्याने हा उपक्रम घेण्यात आला.
- जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष मनसे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.