आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावात वैमानिक प्रशिक्षण सुरू, दहावीसह बारावी उत्तीर्णांसाठी संधी; लेखी आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रम एक वर्षाचा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी उड्डयन मंत्रालयाने जळगावात विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या घाेषणेनंतर प्रशिक्षण कंपन्या व विमान प्राधिकरणात करार झालेला आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावर खासगी व व्यावयासिक वैमानिक प्रशिक्षण केंद्रास दोन महिन्यांपासून सुरुवात झाली. सध्या सहा विद्यार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत. राज्यातील दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

नागरी उड्डयन मंत्रालयाने (डीजीसीए) विमान प्रशिक्षण केंद्र मंजूर केल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने कुठलेही व्यावसायिक शुल्क न आकारता २५ वर्षांसाठी विमानतळावरील सर्व सुविधा वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एका वर्षाचा लेखी व प्रात्यक्षिक असा अभ्यासक्रम राहणार आहे. अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय, हवामान विभाग, विमान प्राधिकरण, केंद्रीय गृह मंत्रालय, सुरक्षा विभाग, महावितरण, प्रदूषण नियंत्रण या विभागांकडून नाहरकत घेण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. दरम्यान व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता त्यासाठी अन्य शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही.

प्रत्येक तीन महिन्यांनी परीक्षा
प्रशिक्षणासाठी एक वर्षाच्या कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्येक तीन महिन्यांनंतर परीक्षा होणार आहे. यात नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार.

एका वर्षाला २०० तासांचे उड्डाण : वैयक्तिक व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांचा कोर्स एका वर्षाचा राहणार आहे. या एका वर्षात व्यावसायिक कोर्सच्या विद्यार्थ्यांना वर्षाला २०० तासांचे उड्डाण करून दिले जाईल. त्यात १८५ तास सिंगल इंजीन व १५ तासांचे मल्टी इंजीन उड्डाण मिळणार आहे. वैयक्तिक वैमानिक कोर्सला ५० तासांचे उड्डाण दिले जाणार आहे, अशी माहिती येथील प्रशिक्षण केंद्राकडून देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता अशी
वैमानिक परवाना हा वैयक्तिकसाठी (पीपीएल- प्रायव्हेट पायलट परमीट) दहावी उत्तीर्ण असे आवश्यक आहे.
व्यावसायिक वैमानिक परवानासाठी (सीपीएल- कर्मशियल पायलट परमीट) बारावीत फिजिक्स, मॅथ व केमिस्ट्री या तीन विषयांसह उत्तीर्ण हाेणे आवश्यक. भारतभरातून कोणीही विद्यार्थी अॉनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज यासाठी करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...