आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा वाद:हिंगणे बुद्रुकच्या माजी सरपंचावर रोखले पिस्तूल; जीवे मारण्याची दिली धमकी, जळगावमधील घटना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे 14 डिसेंबर रोजी रात्री गावातीलच एकाने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत तुला शूट करुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते?, अशी धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे ता. जामनेर) यांच्या विरुद्ध बुधवारी पहाटे प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांचे छातीला बंदूक लावून धमकी दिली. तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नागरिक गोळा झाल्याने दोघांनी पळ काढला.

अनिल चौधरी यांचा नर्सरी आणि शेतीचा व्यवसाय आहे. 13 डिसेंबरच्या सायंकाळी ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी अनिल चौधरी यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर अनिल चौधरी यांनी आपल्याजवळ आज पैसे नसून काम असल्यास उद्या देतो असे म्हटले. अनिल चौधरी यांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ज्ञानेश्वर गोसावी याने अनिल चौधरी यांच्या छातीवर पिस्तुल रोखून तुला आज रात्री आठ वाजेपर्यंत जीवंत ठेवणार ठेवणार नाही अशी धमकी दिली. तु मेल्यावर तुझ्या निवडणूक पॅनलचे काय होईल ते मी पाहून घेईन अशी देखील धमकी दिली.

चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम 307, 323 शस्त्र कायदा 3/25, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे. संशयिताला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जामनेर पोलिस ठाणे आवारात ठिय्या आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...