आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील १६ देशांत ज्यांच्या चित्रकलेला मानाचे स्थान त्यांनी श्रद्धापूर्वक मोठेभाऊ तथा भवरलाल जैन यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रांचा आविष्कार केला. कलावंत ज्यावेळी सभोवतालची सृष्टी आपल्या आतल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा तो कुंचल्यातून सजीव करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रतिभावंतांना जीवनमूल्यांची सखोल जाण असली तर त्या कलाकृती निश्चितच व्यापक भावार्थ घेऊन साकार होतात. माेठेभाऊ यांच्या ८५ चित्रांकृती मनाला आनंद देणाऱ्या, चांगल्या कृतीचा जागर करणाऱ्या सुंदर मनाचं प्रतीक आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.
जामनेर येथील जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो) यांनी भवरलाल जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त मोठेभाऊंच्या जीवनावर आधारित ८५ चित्र चितारलेली आहेत. ‘A tribute to बडे भाऊ’ हे चित्रप्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे सुरू आहे. मंगळवारपर्यंत उद्यानाच्या वेळेत ते पाहता येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो), चोपडा ललित कला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन, तरुण भाटे, विकास मल्हारा, विजय जैन, सचिन मुसळे, सुशील चौधरी, चेतन पाटील, योगेश सुतार, मनोज जंजाळकर, जितेंद्र चौधरी, रूपाली पाटील उपस्थित हाेते.
सात आकड्यांचे गणित उलगडले
पिसुर्वो यांनी जीवनातील सात या आकड्याचे गणित उलगडे आणि सात पासून सुरू झालेला चित्रप्रवास सांगताना मोठ्याभाऊंच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सातपुड्याचा सात रांगा, अंबाई, निंबाई, उमाई, गौराई, मुक्ताई, पावराय, भिवराई या सात बहिणींचे प्रतीकात्मक मांडले आहे. प्रत्येक चित्र वेगळा विषय आणि आशय मांडणारा आहे.
प्रदर्शनात मांडली ८५ चित्रे
कान्हदेशातील मातीत वाढून जगाला वेगळी ओळख निर्माण करणारे भवरलाल जैन हे जामनेर तालुक्यातील वाकोदचे. तर चित्रकार पिसुर्वो ही जामनेर तालुक्यातील. पिसुर्वो यांनी कान्हदेशातील रंग, माती, संस्कृती आणि निसर्गाला आपल्या विशिष्ट चित्रशैलीत जगासमोर आणले. यातून त्यांची जवळपास १६ देशांमध्ये प्रदर्शने कलाप्रेमींना भुरळ घालून गेली.
याच भूमिपुत्राने आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत तथा उद्योजकाच्या उद्देशून ‘माणूस कितीही व्यस्त किंवा मोठा असला तरी समाजासमोर तो अनेकांतील एक असतो’ तसे पद्मश्री डॉ. भवरलाल जैन. यांच्या जीवनावरती ८५ चित्रे चितारलेली असून ती लक्ष वेधताहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.