आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:युवासेना महानगरतर्फे पेट्रोल पंपावर भोंगा बजाओ; महंगाई भगाओ आंदोलन

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून जळगावात युवासेना महानगरतर्फे उपहासात्मक असे “भोंगा बजाओ, महंगाई भगाओ” आंदोलन पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपावर करण्यात आले. राज ठाकरे यांच्यासह राणा दांपत्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. वाढलेल्या महागाईवरून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्ह्याचे प्रमुख शिवराज पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे, शहरप्रमुख ज्योती शिवदे, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पीयूष गांधी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, भूषण सोनवणे, उमाकांत जाधव, यश सपकाळे, जय मेहेता, अमोल दहाड, गिरीश सपकाळे, अमोल मोरे, अभिजित रंधे, पुष्पक सुर्यवंशी, यश सोनवणे, मयूर रंधे, प्रतिक देवराज, शैलेंद्र राजपूत, सचिन शर्मा, वैशाली झाल्टे, वैष्णवी खैरनार, जया थोरात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...