आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम 2016 चे कलम 26 मध्ये नमूद केलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्यमान सदस्यांची पाच वर्षांची मुदत 31 ऑगस्ट 2022 रोजी समाप्त होत आहे. या कायद्याच्या कलम 62 (1) नुसार प्रत्येक नवनियुक्त प्राधिकरणांच्या सदस्यांची मुदत 1सप्टेंबर 2022 पासून दिनांक 31 ऑगस्ट 2017 या कालावधीसाठी असेल. या प्राधिकरणांच्या निवडणूक, नामनिेर्देशन व स्वीकृतीची प्रक्रीया सुरु करण्याचे कुलगुरुंनी निर्देश दिले आहे.

निवडणूकी संदर्भांतील संपूर्ण माहिती, अधिसूचना व इतर अनुषंगिक पत्रव्यवहार हा विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावरील www.nmu.ac.in/election या पोर्टलवर तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील कक्ष क्र.407 च्या बाजूला असलेल्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच निवडणूकी संदर्भातील सर्व पत्रव्यवहार हा वरील संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे. त्याचे अवलोकन व नोंद घेण्याची जबाबदारी संबंधितांची असेल.

निवडणूक विभागप्रमुख म्हणून डॉ. एस. आर. भादलीकर हे काम पाहणार असून निवडणुकीसंदर्भातील मूळ कागदपत्रे व पत्रव्यवहार डॉ. भादलीकर निवडणूक विभाग प्रमुख कक्ष क्र. 410 तिसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, कबचौ उमवि, जळगाव येथे स्वीकारला जाईल. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्था व सायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, व्यवस्थापन प्रतिनिधी, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...