आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त कौशल्य:कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात जर्मन, जपानी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

प्रतिनिधी । जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या वतीने जर्मन आणि जपानी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कुलुगुरूंच्या हस्ते अभ्यासक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

उद्घाटनावेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले, नियमित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्व विकासासाठी इतर कौशल्यांचीही गरज असते. विद्यापीठाने सुरू केलेल्या जर्मन आणि जपानी भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त कौशल्य निर्माण होतील. ​​​​​​​

विभागाच्यावतीने ऑनलाईन पध्दतीने या दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु झाले आहेत. आपल्या उदघाटकीय भाषणात कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आजच्या काळात सॉफ्ट स्कील असणे अत्यावश्यक झाले आहे. बहि:स्थ विभागाच्या वतीने ती गरज लक्षात घेवून या भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु झाले आहे. याशिवाय जे नियमित शिक्षणासाठी येवू शकत नाही, त्यांच्यासाठीदेखील या विभागाच्या वतीने विविध अभ्यासक्रम सुरु आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी अधिक फायदा घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी या दोन परकीय भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेतल्याबद्दल कुलगुरूंनी आनंद व्यक्त केला. या वेळी जपानी भाषा शिकवणाऱ्या माया नरसापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे विश्वची माझे घर ही कल्पना आता या भाषा शिकल्यामुळे अस्तित्वात येईल, असा आशावाद व्यक्त केला. इंग्रजी भाषेची भीती बाळगू नका, असेही त्या म्हणाल्या. जर्मन भाषा शिकविणाऱ्या श्रेया पाठक यांनी परदेशात भारतीय संस्कृतीविषयी आदराची भावना असल्याचे सांगून भारतीयांनी अन्य संस्कृतीचा मान ठेवावा तसेच व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले.

बहि:स्थ शिक्षण अध्ययन विभागाचे प्रभारी संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या शिक्षणक्रमाची माहिती दिली. डॉ. मनिषा जगताप यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या ऑनलाईन शिक्षणक्रमासाठी ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून जळगाव, धुळे व नंदुरबार व्यतिरिक्त मुंबई, पुणे, नाशिक, रायगड व मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...