आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी मागणाऱ्याची पाेलिसांनी काढली धिंड:गेंदालाल मील भागातील घटना, शस्त्राचा धाक दाखवत वसुलीचा प्रयत्न

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या शिवाजीनगरातील गेंदालाल मील या मजुर व दाट वस्ती असलेल्या भागात शस्त्रांचा धाक दाखवत खंडणी वसुल करणाऱ्या संशयिताला शहर पाेलिसांनी बेड्या ठाेकून परिसरातून त्याची धिंड काढली.

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, दादावाडी परिसरातील रहिवासी बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल परिसरात रामकृष्ण मेडीकल अाहे. ते बुधवार दि. 31 ऑगस्ट राेजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेडिकलवर बसले असताना अजीज खान बाबुखान पठाण (वय 38, रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा दुकानावर आला. त्याने तुला दुकान चालवायचे आहे ना, मग मला पाच हजार रुपयांची खंडणी दर महिन्याला दे, अशी मागणी केली होती.

काउंटरवर चाॅपर ठेवत मारहाण

मेडिकल चालक पाटील यांनी नाही म्हटले असता अजीज पठाण याने काऊंटरवर चाॅपर ठेवून मला पैसे दिले नाही तर तुला धंदा करू देणार नाही अशी धमकी देत मारहाण केली. उपचार घेतल्यानंतर पाटील यांनी शहर पाेलिस ठाण्यात जावून अजीज खान विरुध्द शनिवारी तक्रार दिली.

अटकेसाठी नेमले पथक

या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्याचे निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी पाेलिस उपनिरिक्षक अरुण साेनार, दत्तात्रय पाेटे, हेड काॅन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, रतन गिते आदीचे पथक नेमले. या पथकाने रविवारी दुपारी गेंदालाल मील परिसरात जावून गेट नंबर 1 समाेर साफळा रचला. व पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आराेपीला शिताफीने अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बेड्या ठाेकून काढली धिंड

गेंदालाल मिल परिसरात वरचेवर गावगुंड दादाचा त्रास नागरिकांना हाेत असताे. त्याबाबत त्रास नकाे म्हणून काेणी पुढे येत नाही. अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वचक बसावा म्हणून पाेलिस पथकाने अजीज खान याला बेड्या ठाेकून पाेलिस हिसका दाखवत त्याची परिसरातून धिंड काढली.

गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त

पळून जाणाऱ्या अजित पठाण याचे कडून त्यांनी या गुन्ह्यासाठी वापरलेले चोपर पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान अजिज खान याने आणखी कोणाला धमकावून खंडणी वसूल केली असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...