आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पोलिसांमध्ये हाणामारी:उपनिरीक्षकास बाटली मारुन फेकणारा पोलिस कर्मचारी निलंबित; पोलिस मुख्यालयात बदली

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रामानंदनगर पोलिस ठाण्यात‎ निरीक्षकांच्या दालनात‎ उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्याशी वाद घालून पोलिस‎ कर्मचाऱ्याने त्यांना स्टीलची बाटली‎ फेकून मारली होती. त्यात‎ उपनिरीक्षक जखमी झाले होते.‎ त्यांच्या फिर्यादीवरुन 20 जून रोजी अनमोल सत्तार पटेल या‎ पोलिसाविरूद्ध शासकीय कामात‎ अडथळा तसेच इतर कलमान्वये‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎ यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पटेल यांना निलंबित करुन त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.

पोलिस ठाण्यात आलेल्या एका तक्रार अर्जाच्या चौकशीवरुन या दोघांमध्ये वाद झाले होते. संबधित तक्रारदार नुर मोहंमद गफुर याला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर वाद पेटला. यात संतापलेल्या पटेल यांनी थेट स्टीलची बाटली देशमुख यांना मारुन फेकली होती. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस ठाण्यात बेशिस्त वर्तन केल्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपअधीक्षक कुमार चिंथा यांना दिले होते. चिंथा यांनी चौकशी करुन मंगळवारी सायंकाळी अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला. यात प्रथमदर्शनी दोषी आढळुन येत असलेल्या पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे.