आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संचारबंदी:नवापूरात श्रीजी गेस्ट हाऊसवर पोलीसांचा छापा, लाॅकडाऊन दरम्यान लाॅजमधून निघाले जोडपे

नवापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नवापूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

देशात कोरोना आजाराचा संदर्भात संचारबंदी लागू असल्याने संपूर्ण शहर बंद असतांना  शहरातील श्रीजी गेस्ट हाऊस लॉकडाऊन काळात सुरु असल्याची माहीती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक नासीर पठाण यांच्या पथकाला मिळाली होती. बुधवारी संध्याकाळी नागपूर सुरत महामार्गावरील श्रीजी गेस्ट हाऊसवर छापा टाकून पोलिसांनी एक महिला आणि पुरुषाला ताब्यात घेतलं आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु होता असा पोलिसांना संशय आहे.श्रीजी गेस्ट हाऊस संचालक नानकचंद हिरालाल अग्रवाल रा.आदर्श नगर नवापुर यांची विचारपूस केली.काउंटर वरील नोंदणी रजिस्टर चेक केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिल २०२० रोजी खोली क्र.१२ मधून बंद होती. पोलिसांनी बेल वाजवली ब-याच वेळानंतर दरवाजा उघडला असता अर्ध वस्त्र परिधान केलेला पुरूष बाहेर आला. तर महिला पगंलाजवळ तोंडाला रूमाल बांधून उभी होती. दोघांची विचारपुस केली असता लाॅजच्या रजिस्टर मध्ये नोंद नव्हती. त्यानंतर नोंद करण्यात आली. नवापूर शहरातील अनेक गेस्ट हाऊस मध्ये भरदिवसा अनैतिक संबंध चालत असल्याची चर्चा आहे. याबाबत नवापूर पोलीसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

नवापूर शहरातील तिनटेंभा परिसरात राहणारे गांवडी काम करणारे मिस्त्री व त्याचा सोबत नवापूर तालुक्यातील आमलाण येथील एक महिला असे मिळुन आल्याने श्रीजी गेस्ट हाऊस संचालक यांनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर नवापूर पोलीस ठाण्यात लाॅकडाऊन दरम्यान गेस्ट हाऊस सुरू ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉज मालकांनी नियम अटींचे पालन करावे

शहरातील लॉज मालकांनी नियम अटींचे पालन करून लॉजमध्ये राहायला येणाऱ्यांना खोल्या द्याव्यात जेणेकरून अशा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. लाॅज मध्ये रजिस्टर अद्यावत ठेवले पाहिजे लाॅकडाऊन दरम्यान लाॅज बंद असताना सुरू करू नये यासंदर्भात सर्वांना सुचना केली होती. -विजयसिंह राजपूत, पोलिस निरीक्षक, नवापूर

बातम्या आणखी आहेत...