आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शस्त्र प्रदर्शनात पाेलिसांचे‎ कार्य; शस्त्रांची देणार माहिती‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दल, भवरलाल‎ ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व‎ युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त‎ विद्यमाने ४ रोजी सकाळी ९.३०‎ वाजता काव्यरत्नावली चौकात‎ शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात‎ आले आहे. यात शस्त्र, श्वानपथक,‎ पोलिस बँड, बॉम्ब शोधक व नाशक‎ पथक, वायरलेस यंत्रणा यांचे‎ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.‎ प्रदर्शनाचे उद््घाटन‎ जिल्हाधिकारी अमन मित्तल,‎ पोलिस अधीक्षक एम. राजकुमार‎ यांच्या हस्ते होणार आहे.

या‎ प्रदर्शनाला जळगावकर नागरिक‎ तसेच शाळा व महाविद्यालयीन‎ विद्यार्थ्यांनी भेट देऊन या‎ शस्त्रांविषयी माहिती जाणून घ्यावी,‎ असे आवाहन आयोजकांतर्फे‎ करण्यात आले आहे. या वेळी जैन‎ इरिगेशन सिस्टम्स लि.चे अध्यक्ष‎ अशोक जैन, अप्पर पोलिस‎ अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस‎ उपअधीक्षक (गृह) संदीप गावित,‎ युवाशक्तीचे विराज कावडिया‎ उपस्थित राहणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...