आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:शरीरात वेदना असल्यास ब्लॉकेजची शक्यता, कोरोनानंतर दिसताहेत लक्षणे, बरे झालेल्या पाच टक्के रुग्णांना त्रास

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्त पातळ न झाल्यास रुग्णांना जाणतोय त्रास

कोरोनाच्या संसर्गामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असतात. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होणे, तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्तवाहिन्यांमध्ये ब्लाॅकेजची समस्या निर्माण होत आहे. कोरोनातून बाहेर पडलेल्या रुग्णांपैकी किमान ५ टक्के रुग्णांमध्ये हा त्रास उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काेराेनाचा विळखा प्रचंड वाढला असून, नागरिकांना काेराेना उपचारानंतर प्रचंड अशक्तपणा येत असताे. काेराेनातून बरे झाल्यानंतरदेखील बहुसंख्य रुग्णांना शरीरातील वेगवेगळ्या व्याधींचा सामना करावा लागत अाहे. सुरुवातीला अति सामान्य वाटणारे हे लक्षणे कालांतराने ताण वाढवणारे ठरण्याची भीती असते. काेराेनातून सुखरूप बाहेर पडलेल्या बऱ्याच रुग्णांना शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार हाेण्याचा त्रास जाणवत असल्याचे डाॅक्टरांकडे तपासणीनंतर उघड हाेत अाहे.

रक्त पातळ न झाल्यास रुग्णांना जाणतोय त्रास
काेराेनातून बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांना रक्त पातळ हाेण्याच्या गाेळ्या दिल्या जातात. डाॅक्टरांच्या सल्ल्याविना त्या बंद केल्यास ५ ते १० टक्के रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याचे प्रमाण असते. त्यामुळे नियमित तपासणी गरजेची आहे. - डाॅ. निखिल पाटील, जळगाव

पाच टक्के रुग्णांना हाेताे त्रास
काेराेनाच्या उपचारानंतर घरी परतलेल्या असंख्य रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांमध्ये छातीत दुखणे, स्टेनमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार हाेणे, पायाच्या रक्तवाहिनीत गाठी तयार हाेणे, फुप्फुसात गाठी तयार हाेऊन त्याचा हृदयावर दाब पडणे असा त्रास हाेत असताे. हा त्रास सरसकट सर्वच रुग्णांना हाेत नाही; परंतु ज्यांना अशी लक्षणे जाणवतात त्यांनी तातडीने कार्डियाेलाॅजीस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अशी आहेत लक्षणे

  • चालताना अथवा बाेलताना दम लागणे.
  • रक्तदाब कमी हाेणे अथवा वाढणे.
  • छातीत वारंवार वेदना हाेणे.
  • पायाच्या रक्तवाहिनीत गाठ झाल्याने दुखणे.
  • मेंदूत रक्ताची गुठळी तयार हाेऊन पॅरॅलिसीसचा त्रास हाेणे.

रक्ताच्या गाठी तयार हाेणे प्रमाण अधिक...
काेराेनावर मात केल्यानंतर काही दिवसांनंतर रुग्णांमध्ये छातीत दुखणे, पाय दुखणे, रक्तदाब वाढणे अथवा कमी हाेण्याची लक्षणे दिसत अाहेत. रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गाठी तयार हाेणे हे मूळ कारण असते. छातीत, पायात, मेंदूत अथवा पायात अशा गाठी तयार हाेऊ शकतात. ही लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्के पर्यंत अाहे. - डाॅ. विवेक चाैधरी, कार्डिअाेलाॅजीस्ट, जळगाव

बातम्या आणखी आहेत...