आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर स्पर्धा:स्तनपान विषयावरील पाेस्टर प्रदर्शन, ३२ स्पर्धक सहभागी

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत व स्तनपान सप्ताहच्या अनुषंगाने शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तनपान या विषयावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यात ३२ स्पर्धक सहभागी झाले.

देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जाताे आहे. या अंतर्गत जीएमसीत शिकणाऱ्या तसेच परिचारिका प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्तनपान हा विषय घेऊन पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण कसोटे व ‘क्ष’ किरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली वासडीकर यांनी केले. स्पर्धेत ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डाॅक्टर्स उपस्थित हाेते.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्पर्धेत असे पाेस्टर लावून स्तनपान सप्ताहात प्रबाेधन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...