आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगाव, नंदुरबारसह राज्यभरातील दहा महाविद्यालयांत परिचारिकांना पदस्थापना ; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीत झाला निर्णय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांनी २३ मेपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. परिचारिकांच्या मागण्यांबाबत नुकतीच वैद्यकीय शिक्षण विभागासोबत बैठक घेण्यात आली असून यात राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाळणाघर उपलब्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे तर राज्यातील सर्वाधिक परिचारिकांच्या जागा रिक्त असलेल्या १० महाविद्यांमध्ये इच्छुकांना पदस्थापना देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यात खान्देशातील जळगाव व नंदुरबार येथील वैद्यकिय महाविद्यालयांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या वेळी काही मागण्या मान्य करण्यात आल्या तर काही मागण्यांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बैठकीचे इतिवृत्त बुधवारी सादर झाल्यानंतर राज्यभरातील परिचारिकांनी संप मागे घेतला. यात परिसेविकांची रिक्त पदे, नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी विचार करून निर्णय देण्यात येतील असे सांगण्यात आले. या निर्णयामुळे रुग्णसेवेवरील ताण कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...