आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Posting Of Nurses In Ten Colleges Across The State Including Jalgaon And Nandurbar; The Decision Was Taken At A Meeting Of The Medical Education Department |marathi News

दिव्य मराठी विशेष ​​​​​​​:जळगाव, नंदुरबारसह राज्यभरातील दहा महाविद्यालयांत परिचारिकांना पदस्थापना; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीत झाला निर्णय​​​​​​​

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांनी २३ मेपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. परिचारिकांच्या मागण्यांबाबत नुकतीच वैद्यकीय शिक्षण विभागासाेबत बैठक घेण्यात आली असून यात राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाळणाघर उपलब्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे तर राज्यातील सर्वाधिक परिचारिकांच्या जागा रिक्त असलेल्या १० महाविद्यांमध्ये इच्छुकांना पदस्थापना देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यात खान्देशातील जळगाव व नंदुरबार येथील वैद्यकिय महाविद्यालयांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या वेळी काही मागण्या मान्य करण्यात आल्या तर काही मागण्यांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बैठकीचे इतिवृत्त बुधवारी सादर झाल्यानंतर राज्यभरातील परिचारिकांनी संप मागे घेतला. यात परिसेविकांची रिक्त पदे, नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी विचार करून निर्णय देण्यात येतील असे सांगण्यात आले. या निर्णयामुळे रुग्णसेवेवरील ताण कमी होणार आहे.

इच्छुकांना जळगाव, नंदुरबार पाठवणार
परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती बाह्यस्राेतांद्वारे न करता कायमस्वरुपी करावी या मागणीचा विचार करता नवीन महाविद्यालय व रुग्णालयांत पदभरती होईपर्यंत संघटनेने सुचवल्यानुसार जळगाव, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर व गोंदिया या ठिकाणी प्रस्तावित तसेच नवीन महाविद्यालय व रुग्णालयांतील पदांवर जाण्यास इच्छुक असलेल्या परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी नावे वैद्यकीय शिक्षण कार्यालयास सादर करावी. यांनतर पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे. जळगाव जीएमसीत परिचारिकांची ३९६ पदे रिक्त असून या निर्णयामुळे पदभरती होण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...