आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बालकासाेबत प्राैढाने केले अनैसर्गिक कृत्य

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतंग उडवण्यासाठी मांजा चक्री घेऊन देताे, असे सांगून नऊवर्षीय बालकासाेबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार रविवारी तेली चाैकात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिपेठ पाेलिस ठाण्यात प्राैढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेली चाैकात राहणाऱ्या नऊवर्षीय पीडित बालकाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन श्याम गाेपाल वर्मा याने पंतग उडवण्यासाठी मांजा चक्री घेऊन देताे असे सांगून रविवारी दुपारी साडेतीन ते पावणे पाच वाजेदरम्यान अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून संशयित आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...