आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राैढाचे मृत्यू, दाम्पत्याला जन्मठेप:निवडणुकीच्या वादातून दुचाकीला दिली होती कारने धडक, शामखेड्यातील 8 वर्षांपूर्वीची घटना

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राम पंचायत निवडणुकीत जुना वाद असताना, रस्त्यात उभे राहण्याच्या किरकाेळ कारणावरून झालेल्या भांडणात पाेलिसात तक्रार देण्यास दुचाकीने जाणाऱ्यांना कारने धडक देऊन प्राैढाच्या मृत्यूस जबाबदार दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.एस. सापत्नेकर यांच्या काेर्टाने जन्मपेठ व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली. या खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.

मृताचा मृत्यूपूर्व जबाब तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. ही घटना 19 मे 2013 राेजी घडली हाेती. या बाबत सरकारी वकील पंढरीनाथ बी. चाैधरी यांनी दिलेल्या माहिती नुसार, धरणगाव राेडवर शामखेडा गावातील प्लाॅट भागात भगवान लक्ष्मण सातपुते त्याचा भाऊ रघुनाथ सातपुते व पुतण्या महेंद्र सातपुते हे 19 मे 2013 राेजी सकाळी 8 ते 9.30 वाजेच्या दरम्यान गप्पा मारत उभे हाेते.

तिघे उभे असलेल्या ठिकाणी याेगेश पांडुरंग सातपुते व त्याची पत्नी सपना याेगेश सातपुते हे दाेन्ही दुचाकी आले. योगेश सातपुते आणि तिघांत ग्राम पंचायत निवडणुकीतून वाद होता. त्यामुळे याेगेशने मुद्दाम दूचाकी थांबवून ‘तुम्हाला रस्त्याच्या बाजुला थांबता येत नाही का?’ बाेलून वाद उकरून काढला व भगवान यांच्यासह इतरांना शिवीगाळ केली. तसेच याेगेशची पत्नी सपना हीने ‘आज यांना साेडू नका, खलास करून टाका’ अशी चिथावणी दिली हाेती.

याबाबत भगवान, रघुनाथ व महेंद्र हे तिघे जण महेंद्र यांच्या माेटारसायकलीने धरणगाव पाेलिस ठाण्याकडे जात हाेते. या दरम्यान, याेगेश याने घरी दुचाकी लावून येत कार क्रमांक (एम.एच. एई. 896) घेऊन आला. कारच्या पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात भगवान सातपुते (वय 55) हे फेकले जावून गंभीर जखमी झाले होते. तर रघुनाथ दुसरीकडे फेकले गेले होते. परंतु दूचाकी चालवत असलेला महेंद्र हा दूचाकीसह कारच्या खाली आला. कार न थांबविता आरोपींनी त्याला फरफटत नेले.

या घटनंतर उपचार घेताना भगवान यांचा मृत्यू झाला. धरणगाव ठाण्यात भादंवि कलम 302, 307 व 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पुढील तपास करून तपासी अधिकारी पाेलिस उपनिरिक्षक एन.एम. काळे यांनी काेर्टात दाेषाराेपपत्र दाखल केले.

खून प्रकरणी जन्मठेप व प्रयत्नासाठी 5 वर्ष शिक्षा

याेगेश व सपना सातपुते या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच भांदवि कलम 307 अन्वये पाच वर्ष सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...