आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीर्णोद्धार:भादली येथे उद्या श्री महादेव‎ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा साेहळा‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भादली बु. येथे श्री महादेव मंदिराचा‎ जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा‎ गुरुवारी आयाेजित करण्यात आला‎ आहे. यानिमित्त मंगळवारी सकाळी‎ गावातून शोभायात्रा निघा ली.‎ शाेभायात्रेत लहान बालकांनी‎ ज्ञानेश्वर, विठ्ठल रुखमाई, गणपती,‎ शंकर-पार्वती यांची वेशभूषा करून‎ सहभागी झाले. महात्मा गांधी‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम‎ प्रात्यक्षिके सादर केली, भजनी‎ मंडळ, ढोलताशांच्या गजरात ही‎ शोभायात्रा काढण्यात आली.‎ गावातील हे शतकालीन जागृत मंदिर‎ देवस्थान आहे. या मंदिराचा‎ जीर्णोद्धार व्हावा, या हेतूने ग्रामस्थांनी‎ देणगी जमा करून या मंदिराची‎ दुरुस्ती केली आहे. यानिमित्त श्री‎ महादेव मंदिराला विद्युत रोषणाई‎ करण्यात आली आहे. यासह‎ दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ तसेच २० हजारांपेक्षा अधिक‎ भाविकांसाठी गाव पंगतीचे आयोजन‎ करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...