आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अवकाळी'चीही यंदा अवकृपाच:मे महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीटीने जिल्ह्यात  766 हेक्टरवरील केळीचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने चाेपडा, यावल व रावेर या तीन तालुक्यातील केळी पीकाचे माेठे नुकसान झाले आहे. या दाेन्ही वर्षांतील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागातर्फे बुधवारपासून सुरु करण्यात आले आहे.

प्राथमिक अहवालानुसार 55 गावातील 955 शेतकरी बाधित झाले असून सुमारे 766.50 हेक्टर क्षेत्रावरील केळी पीकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात 22 ते 24 व 31 मे राेजी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे सर्वच पीकांचे नुकसान झाले. परंतु केळी पीकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातही प्रामुख्याने चाेपडा, यावल व रावेर या तीन तालुक्यात माेठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनाम्याचे काम कृषी विभागातर्फे बुधवारपासून करण्यात येत आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान

अ.क्र. तालुका, दिनांक, बाधित गाव संख्या, बाधित शेतकरी संख्या, केळी पीकाचे झाले नुकसान (हेक्टरमध्ये )

  • चाेपडा - 31 मे, 7 , 75, 48.70.
  • यावल - 31 मे, 33, 304, 247.00
  • रावेर - 31 मे,15, 576,470.80.
  • एकूण - 55 गाव, 955 बाधित शेतकरी
बातम्या आणखी आहेत...