आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद मंधवानी यांचे निधन

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी. एम. नगर येथील रहिवासी तथा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद टोपणदास मंधवानी (वय ७४ यांचे मंगळवारी महाबळेश्वर येथे हद‌्यविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, मुलगा, पुतणा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रेम मंघवानी यांचे वडील होते. सिंधी समाजात उच्चशिक्षित, सुसंस्कृत व सेवाभावी व्यक्तित्व अशी हिरानंद यांची ख्याती होती. ते अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, केशवस्मृती सेवा संस्था समूह, कंवरनगर एज्युकेशन सोसायटी, जनता बँक या संस्थांशी जुळलेले होते.

बातम्या आणखी आहेत...