आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रवीण पाटील चोपडा शिरपूर रोडवरील शिव कॉलनी भागात वास्तवाल असून प्रणित उर्फ प्रिन्स नितीन पाटील या बालकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहिर झाला आहे, या संबंधित माहिती आज राज्यपाल कार्यालयातून पाटील कुटुंबियाना तशी माहिती देण्यात आली आहे.प्रणित नितीन पाटील हा चोपडा शहरातील पंकज ग्लोबलचा विद्यार्थी असून या विद्यार्थ्याने त्याने ५ डिसेंबर २०१९ रोजी घडलेल्या घटनेत त्याने चोरट्यांशी कडवी झुंज देत आई व मोलकरणीला मदत केली होती. यामुळे, त्या बालकाला राष्ट्रपती बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून हा पुरस्कार मार्च महिन्यात देण्यात येईल अशी माहिती पालक नितीन रामभाऊ पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितली.
गेल्या वर्षी नितीन पाटीलच्या चोपडा शहरातील शिव कॉलनीत असलेल्या साई अपार्टमेंटमध्ये ५ डिसेंबर २०१९ रोजी भरदुपारी पावणे चार वाजता अज्ञात चोरट्यांनी नितीन घरी नसतांना अपार्टमधील तिसऱ्या मजल्यावर जाऊन लुटमार करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. तसेच, चोरटयांनी मिरची स्प्रेच्या साहाय्याने प्रणितची आई वैशालीच्या तोंडावर स्प्रेचा फवारा करत लुटमारीच्या उद्देशाने घरात धुडगूस घातली होती. यावेळी, बारा वर्षांच्या प्रिन्सने त्या चोरट्याचा पाय घट्ट धरून ठेवत चोरट्याला इतरत्र कुठेही फिरकण्यास संधी दिली नाही. दरम्यान, घरात काम करणारी मोलकरीण लताबाईने तिसऱ्या मजल्यावरून खाली आरडा-ओरड केल्यानंतर स्थानिक रहिवासी जमा झाले होते. त्यामुळे, दोन्ही चोरटे खाली पळून जात असताना तेथे एकत्र जमलेल्या लोकांमुळे चोरट्यांना पकडण्यात यश मिळाले होते. प्रिन्सने तेव्हा केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.
तत्कालीन पोलिस निरीक्षकने प्रिन्सचा बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव टाकण्याच्या सांगण्यावरून पालक नितीन पाटीलने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, आज मंगळवारी राज्यपाल कार्यालयातून नितीन पाटील यांना आपल्या मुलाला बालशौर्य पुरस्कार जाहीर झाल्याचे फोनवरून कळविण्यात आले आहे. नितीन पाटील हे एका शाळेचे चेअरमन असून आई चोपडा शहरातील दिया गॅस एजेंसीच्या संचालिका आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.